Every human body is different even though made up of same element. One should do the arrangements as per the nature of our body. There are several natural cleansers described in Ayurveda. some of them are here which may use commonly.
१. कड़ुनिम्ब -
सहज आणि भरपूर प्रमाणात मिळणारा कड़ुनिम्ब हा सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वापरला जाऊ शकतो, खास करून पिम्पल्स असणाऱ्या त्वचेसाठी जास्त उपयोगी आहे. कड़ुनिम्बची ओली पाने थोडे पाणी घालून ठेचून घ्या गळून त्याचा निघणार रस चेहऱ्याला लावा, डोळ्याचा आणि ओठांचा भाग टाळून इतर चेहऱ्याला लावा, रस कोरडा होइ पर्यंत ठेवा नंतर सुकला की धुवून टाका, बाजारात मिळणारी निम्ब पावडर पण तुम्ही वापरू शकता चेहऱ्याचे पिम्पल्स कमी होतील व रंग उजळण्यासाठी मदत होईल
२. कोरफड -
थोड़ा चिकट असणारा पण त्वचेचा पोत उत्तम राखणारा पदार्थ म्हणजे कोरफड, १ चमचा कोरफडगर काढून घ्या, चेहर्यावरती गोलाकार फिरवत रहा, पुर्ण चेहऱ्याला गर लागला की सुके पर्यंत राहु दया नंतर गार पाण्याने धुवून टाका. नितळ आणि चेहऱयावर चमक आणण्यासाठी उत्तम उपाय.
३. टोमॅटो -
त्वचेचा रंग आठ दिवसांमधे उजळवण्यासाठी उत्तम फेस पैक म्हणजे टोमॅटोचा रस, यामधे असणाऱ्या फ्रूट असिड मुळे रापलेली त्वचा सुद्धा पुन्हा उजळते, यासाठी एक टोमेटो मिक्सर मधून काढून घ्या, हे गर तुम्हाला आठ दिवस जाऊ शकतो, चेहऱ्याला लावून ठेवा सुकल्यानंतर धुवून टाका, रोज आठ दिवसांसाठी करा, फरक तुम्ही मला कळवा,
४. डाळीचे पीठ -
हरभरा डाळीचे पीठ, जे आपल्या घरामधे बेसनच पीठ असत त्या पिठाने जर रोज झोपताना चेहरा धुतला तर व्हाइट हेड्स आणि स्किन ऑइल कमी होते, चेहरा आधी ओला करून घ्या, हातावर डाळीचे पीठ घ्या हळूहळू हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, दोन ते तीन मिनिट नंतर चेहरा धुवून घ्या, तेलकट त्वचेसाठी उत्तम उपाय आहे.
उत्तम परिणामासाठी वरील कुठलाही एक क्लेनज़र रोज एकदा वापरावा. किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस वापरला तरी चालेल. वापरून पहा आणि काही शंका असतील तर तुमचे मत मांडू शकता.
वैद्य. मनस्वी जाधव
आयुर्वेदाचार्य
कोल्हापुर [पुणे]
Comments
Post a Comment