वसंत ऋतूमध्ये केले जाणारे वमन म्हणजेच वासंतिक वमन होय. हेमंत व शिशिर ऋतूमध्ये वातावरणातील गारव्यामुळे शरीरात जमा झालेला कफ वसंताच्या सूर्याच्या किरणांनी निसर्गतः वितळतो व रुग्णाला कफाचे आजार सर्दी, खोकला, दमा, त्वचा विकार, सांधेदुखी इत्यादी आजार होताना दिसतात तेव्हा वसंतात पंचकर्मातील वमन हे कर्म करावे
वमन म्हणजे काय ?
वमन हा एक पंचकर्मातील उपक्रम आहे. ज्यामध्ये आपण वर्षभर शरीरामध्ये साठणाऱ्या कफ , पित्त तसेच आधुनिक गोळ्या, औषधे यांच्या सततच्या वापरामुळे शरीरात साठणाऱ्या विषारी द्रव्यांना शरीराबाहेर काढण्याच काम करतो. थोडक्यात शरीराचं सर्व्हिसिंग म्हणा.
वमन हे शरीरातील वाढलेल्या मुख्यतः कफ दोषाला बाहेर काढण्याची आयुर्वेदोक्त शास्त्रीय पध्दत आहे . ज्यात शरीरात वाढलेल्या आमाचे प्रथमतः औषधांद्वारे दीपन पाचन म्हणजे स्वस्थानातून वाढलेल्या दोषांना कमी केले जाते व त्यानंतर आयुर्वेदोक्त औषधांच्या तूप व तेलादी प्राशनाने वाढीव दोषांना एकत्रित करून उलटीद्वारे ते बाहेर काढले जाते
म्हणजे फक्त घश्यात जमा होणारा दोष म्हणजे कफ नव्हे, सांध्यांच्याठिकाणी असणारा कफ दोषदेखील इथे अपेक्षित आहे .जो दोष संधी व अवयवाचे आवरण जोडण्याचे कार्य करते. हा कफ वाढला तर छातीत कफ होण्याबरोबरच सांध्यांना सूज येते , स्त्रियांना अनियमित पाळीचा व पीसीओडी चा, थायरॉईडचा, लठ्ठपणाचा त्रास होतो. ज्यांना असा त्रास असेल त्यांनी पंचकर्माचा जरूर लाभ घ्यावा.
।। आयुर्वेदोक्त वमन ।।
१ मार्च २०१९ ते ३० मार्च २०१९
तज्ज्ञ वैद्यांना भेटून मोफत नाडीपरीक्षांकरून
निदान व चिकित्सा जाणून घ्या,
संपर्क:९६२३००९६८३/९८३४३१२७१
मनस्वी आयुर्वेद, कोडोली
Comments
Post a Comment