Skip to main content

Natural cleansers and masks for clean skin

             
                         Every human body is different even though made up of same element. One should do the arrangements as per the nature of our body. There are several natural cleansers described in Ayurveda. some of them are here which may use commonly.

१. कड़ुनिम्ब -
सहज आणि भरपूर प्रमाणात मिळणारा कड़ुनिम्ब हा सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वापरला जाऊ शकतो, खास करून पिम्पल्स असणाऱ्या त्वचेसाठी जास्त  उपयोगी आहे. कड़ुनिम्बची ओली पाने थोडे  पाणी  घालून ठेचून घ्या गळून त्याचा निघणार रस  चेहऱ्याला लावा, डोळ्याचा आणि ओठांचा भाग टाळून इतर चेहऱ्याला लावा, रस कोरडा होइ पर्यंत ठेवा नंतर सुकला की धुवून टाका, बाजारात मिळणारी निम्ब पावडर पण  तुम्ही वापरू शकता चेहऱ्याचे पिम्पल्स कमी होतील व  रंग उजळण्यासाठी मदत होईल

२. कोरफड -
थोड़ा चिकट असणारा पण त्वचेचा पोत  उत्तम राखणारा पदार्थ म्हणजे कोरफड, १ चमचा  कोरफडगर काढून घ्या, चेहर्यावरती  गोलाकार फिरवत रहा, पुर्ण चेहऱ्याला गर लागला  की सुके पर्यंत राहु दया नंतर गार  पाण्याने धुवून टाका. नितळ आणि चेहऱयावर चमक आणण्यासाठी उत्तम उपाय.

३. टोमॅटो  -
त्वचेचा रंग आठ दिवसांमधे उजळवण्यासाठी उत्तम फेस पैक म्हणजे टोमॅटोचा रस, यामधे असणाऱ्या फ्रूट असिड मुळे रापलेली त्वचा सुद्धा पुन्हा  उजळते, यासाठी एक टोमेटो मिक्सर मधून काढून घ्या, हे  गर तुम्हाला आठ दिवस जाऊ शकतो, चेहऱ्याला लावून ठेवा सुकल्यानंतर धुवून टाका, रोज आठ दिवसांसाठी करा, फरक तुम्ही मला कळवा,

४. डाळीचे  पीठ -
हरभरा डाळीचे पीठ, जे आपल्या घरामधे बेसनच पीठ असत त्या  पिठाने जर रोज झोपताना चेहरा  धुतला  तर व्हाइट हेड्स  आणि स्किन ऑइल कमी होते, चेहरा आधी ओला करून घ्या, हातावर डाळीचे पीठ घ्या हळूहळू हलक्या हाताने  चेहऱ्याला मसाज करा, दोन ते तीन मिनिट नंतर चेहरा धुवून घ्या, तेलकट त्वचेसाठी उत्तम उपाय आहे.


उत्तम परिणामासाठी वरील कुठलाही एक क्लेनज़र रोज एकदा वापरावा. किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस वापरला तरी चालेल.  वापरून पहा आणि काही शंका असतील तर तुमचे मत मांडू शकता.

वैद्य. मनस्वी जाधव 
आयुर्वेदाचार्य
कोल्हापुर [पुणे]













































Comments

Popular posts from this blog

वासंतिक वमन

वसंत ऋतूमध्ये केले जाणारे वमन म्हणजेच वासंतिक वमन होय . हेमंत व शिशिर ऋतूमध्ये वातावरणातील गारव्यामुळे शरीरात जमा झालेला कफ वसंताच्या सूर्याच्या किरणांनी निसर्गतः वितळतो व रुग्णाला कफाचे आजार सर्दी , खोकला , दमा , त्वचा विकार , सांधेदुखी इत्यादी आजार होताना दिसतात तेव्हा वसंतात पंचकर्मातील वमन हे कर्म करावे वमन म्हणजे काय ? वमन हा एक पंचकर्मातील उपक्रम आहे . ज्यामध्ये आपण वर्षभर शरीरामध्ये साठणाऱ्या कफ , पित्त तसेच आधुनिक गोळ्या , औषधे यांच्या सततच्या वापरामुळे शरीरात साठणाऱ्या विषारी द्रव्यांना शरीराबाहेर काढण्याच काम करतो . थोडक्यात शरीराचं सर्व्हिसिंग म्हणा . वमन हे शरीरातील वाढलेल्या मुख्यतः कफ दोषाला बाहेर काढण्याची आयुर्वेदोक्त   शास्त्रीय पध्दत आहे . ज्यात शरीरात वाढलेल्या आमाचे प्रथमतः   औषधांद्वारे दीपन पाचन   म्हणजे स्वस्थानातून वाढलेल्या दोषांना कमी केले जाते व त्यानंतर आयुर्वेदोक्त औषधांच्या   तूप व तेलादी प्राशनाने वाढीव दोषांना एकत्रित करू...

SHARAD RITUCHARYA - Life style, Diet Regimen for Autumn Season

                      Sharad Ritu –  (Mid september – Mid November) Ashvin and Kartika as per marathi month.                      Season means Ritu in ayurveda. Ayurveda believes that body is in tune with nature and changes in season leads to imp act on body. Due to same reason emphasis is given on following ritucharya for prevention of diseases. Ritucharya can be best described as a set of regimens to be practiced by us to cope uo with varying effect of the changing seasons on the human body.                   In sharad ritu nature is with lush green all around, decorated with colorful flowers and fruit trees with chirping birds. The skies are clear blue with white clouds floating lazily. Th e days are sunny, yet pleasantly cool and comfortable and nights are slightly chill, clear and cloudless. The weather is mild, pleasant ...

Ayurveda for fighting obesity

                                WHERE THERE IS  A WILL............THERE IS A WAY ! Obesity is the most common health problem now a days. Reasons behind that are different for individuals. But basic root causes as well as risk factors are same. Most common cause is lack of exercise. It could be due to hectic schedule, sitting job, much use of vehicles and less walking, continuous s tress, heavy food, junk and oily food, sweet food, relaxed nature, too much sleep, hereditary, hormonal imbalance . Due to all such kind of life style, calories can’t burn which results into saturation of fat under skin and also inside the veins which is respectively called as fat and cholesterol. Primary signs are little weight gain specially fat deposition on belly, laziness, excessive sweat, breathlessness after little exertion. If anyone ignore these signs eventually goes in second stage which is actually ca...