Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

वासंतिक वमन

वसंत ऋतूमध्ये केले जाणारे वमन म्हणजेच वासंतिक वमन होय . हेमंत व शिशिर ऋतूमध्ये वातावरणातील गारव्यामुळे शरीरात जमा झालेला कफ वसंताच्या सूर्याच्या किरणांनी निसर्गतः वितळतो व रुग्णाला कफाचे आजार सर्दी , खोकला , दमा , त्वचा विकार , सांधेदुखी इत्यादी आजार होताना दिसतात तेव्हा वसंतात पंचकर्मातील वमन हे कर्म करावे वमन म्हणजे काय ? वमन हा एक पंचकर्मातील उपक्रम आहे . ज्यामध्ये आपण वर्षभर शरीरामध्ये साठणाऱ्या कफ , पित्त तसेच आधुनिक गोळ्या , औषधे यांच्या सततच्या वापरामुळे शरीरात साठणाऱ्या विषारी द्रव्यांना शरीराबाहेर काढण्याच काम करतो . थोडक्यात शरीराचं सर्व्हिसिंग म्हणा . वमन हे शरीरातील वाढलेल्या मुख्यतः कफ दोषाला बाहेर काढण्याची आयुर्वेदोक्त   शास्त्रीय पध्दत आहे . ज्यात शरीरात वाढलेल्या आमाचे प्रथमतः   औषधांद्वारे दीपन पाचन   म्हणजे स्वस्थानातून वाढलेल्या दोषांना कमी केले जाते व त्यानंतर आयुर्वेदोक्त औषधांच्या   तूप व तेलादी प्राशनाने वाढीव दोषांना एकत्रित करून उलटीद्वारे ते